image-call
image-whatsapp

आण्णासाहेब विभूते विद्यामंदिर, धरणगुत्ती Annasaheb Vibhute Vidya Mandir – Marathi Medium School in Dharangutti, Shirol, Kolhapur

आण्णासाहेब विभूते विद्यामंदिर, धरणगुत्ती, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर ही शासनमान्य खाजगी प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा असून 100 टक्के अनुदानित आहे. या शाळेची स्थापना सन 1991 मध्ये झाली असून 1997 साली शाळेस शंभर टक्के अनुदान मंजूर झाले. इयत्ता 1 ली ते 7 वी पर्यंत प्रत्येकी दोन तुकड्या याप्रमाणे एकूण 14 तुकड्या कार्यरत असून शाळा गुणवत्तापूर्ण व मूल्याधिष्ठित शिक्षण देण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे.

आमची शाळा संजीवनी शिक्षण प्रसारक मंडळ, धरणगुत्ती या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे कार्यरत आहे. संस्थेचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, शिस्तबद्ध वातावरण व सर्वांगीण विकासाची संधी उपलब्ध करून देणे हा आहे. अनुभवी शिक्षकवर्ग, आधुनिक अध्यापन पद्धती व सहशालेय उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जबाबदार व सुसंस्कृत नागरिक घडविण्याचा शाळेचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे.

पुढे वाचा
about-us

शाळेत दिल्या जाणाऱ्या सोयी व सुविधा

  • आनंददायी व दर्जेदार शिक्षण व्यवस्था

  • तज्ञ व अनुभवी शिक्षक वर्ग

  • इयत्ता १ ली ते ७ वी पर्यंत मराठी माध्यमाची सोय

  • विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी डिजिटल वर्गखोल्या

  • सहशालेय उपक्रमांसाठी स्वतंत्र सुविधा

  • वायफाय कॅम्पस ची सोय

  • ई-लर्निंगद्वारे अध्ययन व पालकांशी सतत संपर्क

  • स्वतंत्र संगणक कक्ष व संगणक शिक्षण

  • सुसज्ज ग्रंथालय व प्रयोगशाळा

  • क्रीडा, सांस्कृतिक व शैक्षणिक स्पर्धांचे आयोजन

  • संगीत शिक्षणाची स्वतंत्र सोय

  • मुला मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची सोय

  • शासन पुरस्कृत सर्व शासकीय योजनांचा लाभ

  • स्पर्धा परीक्षा व बाह्य परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांचे यश

  • पालकांसाठी विविध मार्गदर्शन उपक्रम

  • मुला-मुलींच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर

  • मुला मुलींच्या सुरक्षेतेसाठी शाळेच्या संपूर्ण परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सोय

आम्हाला का निवडाल ?

होय, आण्णासाहेब विभूते विद्यामंदिर ही शासनमान्य व 100% अनुदानित प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा आहे.

शाळेमध्ये इयत्ता 1 ली ते 7 वी पर्यंतचे शिक्षण दिले जाते.

शाळेची स्थापना सन 1991 मध्ये झाली असून 1997 साली शाळा शंभर टक्के अनुदानित झाली आहे.

शाळा संजीवनी शिक्षण प्रसारक मंडळ, धरणगुत्ती यांच्या मार्गदर्शनाखाली चालवली जाते.

होय, पालक-शिक्षक संवाद व मार्गदर्शनासाठी नियमित बैठकांचे आयोजन केले जाते.

प्रवेशासाठी शाळेच्या कार्यालयाशी थेट संपर्क साधावा किंवा दिलेल्या संपर्क क्रमांकावर चौकशी करावी.
शाळेतील वर्गवारी व विद्यार्थी संख्या:
इयत्ता मुले मुली एकूण
1 ली 12 18 30
2 री 17 17 34
3 री 24 26 50
4 थी 29 32 61
5 वी 23 28 51
6 वी 24 19 43
7 वी 39 34 73
एकूण 168 174 342

शालेय उपक्रम

gallery
वृक्षारोपण उपक्रम – पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी जपत विद्यार्थी
gallery
योग दिनानिमित्त विद्यार्थी व शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग.
gallery
अद्यावत संगणक कक्ष – डिजिटल शिक्षणाची प्रभावी अंमलबजावणी.
gallery
भव्य कॉन्फरन्स व प्रोजेक्टर हॉल – आधुनिक अध्यापनाची सुविधा.
gallery
किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन कार्यक्रम
gallery
तंबाखूमुक्त जनजागृती अभियान – आरोग्यदायी जीवनाचा संदेश.
gallery
वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ – गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान.
gallery
स्नेहभोजन कार्यक्रम – विद्यार्थी शिक्षकांमधील आपुलकीचे नाते.

आमच्याशी संपर्क करा

आण्णासाहेब विभूते विद्यामंदिर, धरणगुत्ती

विभूते हायस्कूल, नांदणी नाका, बायपास रोड, धरणगुत्ती, जयसिंगपूर – ४१६१०२.

आम्हाला कॉल करा

+91 9975107260 / +91 9970571082

आम्हाला मेल करा

avibhute.vidyamandir @gmail.com

प्रवेश माहिती फॉर्म

आपल्या मुलाला उज्ज्वल भविष्यासाठी नोंदणीसाठी आजच चौकशी करा..!